राम दातीर माहूर (प्रतिनिधी )येथील कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात सोमवार दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता योगी श्यामबापू भारती महाराज यांच्या...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )येथील कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात सोमवार दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता योगी श्यामबापू भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नितीन उपासणे, प. पू. छत्रपतीदादा कवीश्वर, बाळू महाराज काकाणी, राजेशगिरी महाराज, दुर्गामाता तसेच ह.भ.प. निवृत्ती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनात मार्गदर्शन करताना डॉ. नितीन उपासणे यांनी हिंदू धर्म हा अनादि काळापासून चालत आलेला धर्म असून या धर्माचा कोणताही संस्थापक नसल्याचे सांगितले. हा धर्म कालसंगत असून समाजाला योग्य जीवनमार्ग दाखवणारा धर्म आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.देवदेवेश्वर संस्थानचे छत्रपतीदादा कवीश्वर यांनी आपल्या भाषणात ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ अनेक विद्वानांनी विविध प्रकारे स्पष्ट केला असून हिंदू धर्म हा समाजासाठी जगण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी तेराव्या शतकात धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्सूत्रीच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन केल्याचा उल्लेख त्यांनी केला.अध्यक्षीय समारोपात योगी श्यामबापू भारती महाराज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात एक लाख विराट हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर माहूर येथेही हे संमेलन घेण्यात आल्याचे सांगितले. हिंदू समाजातील ग्लानी दूर करून जागृती निर्माण करणे व राष्ट्रहित जोपासणे हा या संमेलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याचा उल्लेख करत भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याचे आवाहन त्यांनी केले.संमेलनाच्या प्रारंभी संत भगवानबाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह आयोजकांनी वाजतगाजत व जयघोषात भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेची सांगता कपिलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर झाली. यावेळी संस्कार भारतीच्या स्वाती आडे, शितल केदार, वृषाली देशपांडे व सहकारी महिलांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. ‘पसायदान’ पठणाने संमेलनाची सांगता झाली.

COMMENTS