नांदेड प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील 'उस्माननगर' पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत द...
नांदेड प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील 'उस्माननगर' पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा यशस्वी शोध लावला आहे. इतकेच नाही तर तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींनाही पोलिसांनी गजाआड केले आहे.
काय आहे प्रकरण? लोहा तालुक्यातील मौजे कापसी बु. येथील एका पिडीत पालकांनी उस्माननगर पोलीस ठाण्यात ३० जानेवारी २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची त्यांची फिर्याद होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुरन १४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
शोध मोहीम: पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या 'मिशन निर्भया' अंतर्गत अशा संवेदनशील प्रकरणांचा तातडीने तपास करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगवान केली.
'सायबर सेल'ची मोलाची भूमिका: या तपासात गुप्त माहिती आणि सायबर सेलची तांत्रिक मदत महत्त्वाची ठरली. तांत्रिक विश्लेषणावरून बेपत्ता मुलगी गोवा येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार लागलीच उस्माननगर पोलिसांचे एक पथक गोव्याकडे रवाना झाले. गोव्यात पोहोचल्यावरही पथकाने तांत्रिक मदतीने शोध सुरूच ठेवला. तेव्हा ती पिडीत मुलगी गोवा सोडून माळेगाव एम.आय.डी.सी., ता. सिन्नर, जि. नाशिक येथे गेल्याचे समजले. पोलिसांचे पथक तात्काळ नाशिककडे रवाना झाले.
सिन्नरमधून मुलीची सुटका आणि आरोपींना बेड्या: अखेर सिन्नरमध्ये पोहोचलेल्या पोलीस पथकाने यशस्वी कारवाई करत पिडीत मुलीला ताब्यात घेतले. तिला सुखरूप उस्माननगर पोलीस ठाण्यात आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यासोबतच तिला पळवून नेणाऱ्या शिवाजी रामकिशन बिच्चेवाड (वय २०) आणि आकाश आनंदा बिचेवाड (वय १९) या दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कामगिरी: सदर कारवाईत सपोनि एस.डी. निलपत्रेवार, पो.हे.कॉ. गजानन गाडेकर, पो.हे.कॉ. वसंत तिडके, पो.हे.कॉ. प्रकाश पेदेवाड, पो.कॉ. साईनाथ मोरे, तसेच सायबर सेलचे पो.हे.कॉ. दिपक ओढणे आणि राजेंद्र शिटीकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
अधीक्षकांकडून कौतुक: या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले असून त्यांचे अभिनंदन केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे उस्माननगर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा अधिक तपास उस्माननगर पोलीस करत आहेत.

COMMENTS