थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा! फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

मुंबई, (प्रतिनिधी) : हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील...
मुंबई, (प्रतिनिधी) : हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध परंपरा, मंदिरसंस्कृती, तसेच अतिथी देवो भव या तत्त्वावर आधारित आदरातिथ्यामुळे जगभरातील पर्यटक आणि व्यावसायिक येथे आकर्षित होतात.
अशा या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फुकेतमध्ये पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकार झाला आहे.
दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या SQCC Properties LLC (Dubai, UAE) आणि Phuket9 Real Estate Development (Thailand) यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात आहेत.
फुकेतच्या रम्य समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गरम्य वातावरणात उभे राहणारे हे प्रकल्प आधुनिक जीवनशैली, सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देणारे आहेत. त्यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि स्थिर उत्पन्न या तिन्ही दृष्टीकोनातून गुंतवणूकदारांसाठी हा प्रकल्प विशेष ठरत आहे.
'Phuket9' ही कंपनी 2004 पासून फुकेतमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांचा समावेश असून सर्व प्रकल्पांसाठी व्यावसायिक प्रॉपर्टी मॅनेजमेंट सुविधा दिल्या जातात.
मुंबईतील JW Marriott, सहार येथे आयोजित कार्यक्रमात Phuket9 च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa (“Kae”) यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
फुकेतमधील दगडूशेट गणपती मंदिराच्या निर्मितीमागील कथा प्रेरणादायी आहे. या मंदिरात होणाऱ्या शोडोपचार पूजा, आरती आणि भजनात परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून भारतीय संस्कृतीचे जागतिक आकर्षण स्पष्ट होते. या मंदिराची निर्मिती सौ. मीपा यांच्या वडिलांनी केली असून, स्वतः त्यांचा मंदिरातील दररोजच्या सेवा कार्यात विशेष सहभाग असतो.
या प्रसंगी बोलताना मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa (“Kae”) म्हणाल्या, “आमचे ध्येय म्हणजे आमच्या ग्राहक, भागीदार आणि आमच्या टीमसाठी एक मजबूत आणि स्थिर संस्था उभी करणे. या दृष्टीकोनामुळे अधिकाधिक सकारात्मक विचारांचे लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आम्हाला आमच्या मुख्य कार्यालयात आपले वैयक्तिक स्वागत करण्यास नेहमीच आनंद वाटतो. फुकेत येथे आपले हार्दिक स्वागत आहे!”
यावेळी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले, “फुकेत ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भारतीयांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे नवे केंद्र आहे. मराठी संस्कृतीची जोड आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हा प्रकल्प गुंतवणूकदारांसाठी विशेष ठरेल.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यात सातत्याने वाढ करण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय मानली जाते. वाढता पर्यटन व्यवसाय, मर्यादित जमीन उपलब्धता आणि नियोजित विकासामुळे फुकेतमधील मालमत्ता बाजार सातत्याने बळकट होत आहे.
Phuket9 चा फुल-सायकल अ‍ॅप्रोच हा या प्रकल्पाचा मुख्य आधार असून, सखोल मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापनापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि विश्वासार्ह परतावा मिळण्यास मदत होते. कंपनीकडून मोफत कन्सल्टेशन सेवा उपलब्ध असून, ग्राहकांना योग्य मालमत्ता निवडण्यासाठी तसेच वैयक्तिक प्रोजेक्ट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले जाते.
फुकेतमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी आणि संधी जाणून घेण्यासाठी Ms. Shreya Manjjarekar, SOC Corporation Properties LLC, Tel : +971 50 472 9635, +97145136075 Mob: +971505343653, sunil@sqccproperties.com मेलवर किंवा www.sqccproperties.com या वेबसाइटला भेट द्यावी.
मुंबईत संपन्न झालेल्या या विशेष परिषदेला महाराष्ट्रातील विविध शहरांमधून उद्योग-व्यावसायिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. ही महाराष्ट्रातील उद्योजक आणि नागरिकांसाठी सुवर्ण संधी असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आली.
छायाचित्र शीर्षक : मुंबईतील JW Marriott, सहार येथे आयोजित कार्यक्रमात Phuket9 च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa (“Kae”) यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून करण्यात आली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर (राम पब्लिसिटी)

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group