नांदेड: रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर नांदेडमध्ये भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम पाहायला मिळाला. कलांगण प्रतिष्ठान व श्रीराम भक्त मंडळ यांच्य...
नांदेड: रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर नांदेडमध्ये भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम पाहायला मिळाला. कलांगण प्रतिष्ठान व श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीराम पहाट’ या स्वरमय सोहळ्यात, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना ‘रामसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासह ॲड. ठाकूर यांच्या सन्मानाची संख्या आता १११ वर पोहोचली असून, त्यांच्या या अनोख्या विक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते आणि शेकडो रसिकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पहाटे सहा वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ॲड. गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात प्रशांत काळुंदेकर, प्रज्ञा देशपांडे व संज्योती जगदाळे यांनी रामगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
निर्मिती सहाय्य: ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी.
निवेदन: ॲड. गजानन पिंपरखेडे व बापू दासरी.
विशेष उपस्थिती: डॉ. नितीन जोशी, डॉ. सुशील राठी, शिवप्रसाद राठी, रमेश पारसेवार आदी.
कार्याचा गौरव
वर्षभरात तब्बल ९० उपक्रम राबवणारे आणि सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कार्याचा आलेख चढता आहे. १११ पुरस्कारांचा टप्पा गाठल्याबद्दल नांदेडच्या सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाची सांगता श्रीरामाच्या आरतीने झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवप्रसाद राठी, रमेश मेगदे, महेश चांडक आणि मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले.
अमरनाथ यात्रा आणि १७ कोटी रामजप ॲड. दिलीप ठाकूर यांनी सलग २७ वेळा अमरनाथ यात्रेचे यशस्वी आयोजन करून भाविकांची सेवा केली आहे, याची दखल घेत त्यांना हा गौरव देण्यात आला. याच सोहळ्यात १७ कोटी रामजप पूर्ण करणारे ॲड. व्यंकटेश पाटनुरकर यांनाही 'रामसेवा गौरव' तर प्रसिद्ध गायिका रागिणी जोशी यांना 'लता मंगेशकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.
संगीतमय वातावरणात रामजन्मोत्सवशंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पहाटे सहा वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ॲड. गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात प्रशांत काळुंदेकर, प्रज्ञा देशपांडे व संज्योती जगदाळे यांनी रामगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

COMMENTS