स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन यांनी गांधीनगर (गुजरात) येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे अंतर विद्...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन यांनी गांधीनगर (गुजरात) येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे अंतर विद्यापीठ असलेल्या इंफ्लीबनेट केंद्रास भेट दिली. इंफ्लीबनेट केंद्राचे प्र. संचालक श्री मनोज कुमार के. यांनी इंफ्लीबनेट केंद्राचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी इंफ्लीबनेट केंद्राच्या विविध विभागांना भेटी देऊन केंद्राचे उपक्रम व सेवांची माहिती करून घेतली. इंफ्लीबनेट हे भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे केंद्र असून भारतातील सर्व पीएच. डी. प्रबंधाचे डीजीटलायझेशन करून सर्व प्रबंध सर्वाना मुक्त उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वन नेशन, वन सबस्क्रीप्शन अंतर्गत केंद्र शासनाच्या सहा हजार कोटी रुपयाच्या निधीतून तेरा हजाराहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स व डाटाबेस भारतीय उच्च शिक्षण संस्थाना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा इंफ्लीबनेटच्या उपक्रमात सक्रीय सहभाग असून हे विद्यापीठ शोधगंगोत्री या मध्ये भारतात पहिला तर शोधगंगा मध्ये महाराष्ट्रात तिस-या व भारतात पहिल्या वीस विद्यापीठात आहे. वन नेशन, वन सबस्क्रीप्शन, वांग्मयचौर्य तपासणी, विद्वान प्रोफाईल, इंडकॅट, इंडियन रिसर्च इॅन्फोरमेशन मॅनेजमेंट सिस्टम, सोल, शेरनी, लिब वाहिनी इत्यादी डीजीटल उपक्रमात ही हे विद्यापीठ सक्रीय आहे. विद्यापीठाच्या या सक्रीय सहभागाबद्दल इंफ्लीबनेट केंद्राचे प्र. संचालक श्री मनोज कुमार के. आनंद व्यक्त करून विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ मनोहर चासकर यांचे अभिनंदन करून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन यांचा प्रतिनिधिक सत्कार केला. यावेळी शास्त्रज्ञ हितेशकुमार सोळंकी, शास्त्रज्ञ पल्लभ प्रधान, शास्त्रज्ञ होशामनी यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी इंफ्लीबनेट केंद्राकडून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अशोक महाजन यांच्या झालेल्या या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.

COMMENTS