केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धराम महत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण विभाग मुंबईच्या आयुक्त दीपा मुधोळ - मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कौटुंबिक प्रपंच सांभाळून , अध्यापनाचे पवित्र कार्य कर्तव्य तत्परतेने करत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत केलेल्या उल्लेखनीय कार्याची शासनाने दखल घेतली आहे.विविध प्रकारच्या शेकडो पुरस्काराने सन्मानित छायाताई बैस चंदेल यांची व्यसनमुक्ती प्रचारिका म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराची मोहोर उमटवली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे हा पुरस्कार छायाताई बैस चंदेल यांनी त्यांचे यजमान इंजि. गणेशसिंह चंदेल यांच्या सह स्वीकारला. सौ. छायाताई बैस चंदेल यांना त्यांच्या यशाबद्दल. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई लताबाई बैस, मीनाताई बैस, डॉ. शिवचरण सिंह बैस, अपर्णा बैस, डॉ. तुषारसिंह बैस, डॉ. साक्षी बैस, साहेबसिंह चंदेल, कल्पनाताई चंदेल, डॉ. रोशनी चंदेल, डॉ. रोहिणी चंदेल, इंजि. श्रुती चंदेल, राजसिंह चंदेल,विशाल सिंह बैस, पूनम बैस आदींनी अभिनंदन केले.

COMMENTS