उद्या सकाळी १० वाजता होणार अंत्यसंस्कार; कानोडे परिवारावर शोककळा अर्धापूर (प्रतिनिधी): येथील कर्मनिष्ठ आणि अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणू...
उद्या सकाळी १० वाजता होणार अंत्यसंस्कार; कानोडे परिवारावर शोककळा
अर्धापूर (प्रतिनिधी):
येथील कर्मनिष्ठ आणि अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ नागरिक कै. पुरभाजी गोविंदराव कानोडे (वय ८५ वर्ष) यांचे आज शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने अर्धापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कै. पुरभाजी कानोडे हे समाजभिमुख विचार जपणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. जि.प.हा. चौफाळा, नांदेड येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आदर्श माध्यमिक शिक्षक श्री. हरिश्चंद्र कानोडे यांचे ते वडील होत. आपल्या कर्तबगार मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आणि सुसंस्कृत परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कानोडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिक आणि आप्तेष्टांनी हळहळ व्यक्त केली आहे.
उद्या अंत्यसंस्कार:
कै. पुरभाजी गोविंदराव कानोडे यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अर्धापूर येथील धनगर समाज स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे

COMMENTS