नांदेड (प्रतिनिधी) : तर्कविहीन राजनीति विकासाला मारक असते, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए प्रवीण पाटील यांनी केले. न...
नांदेड (प्रतिनिधी) : तर्कविहीन राजनीति विकासाला मारक असते, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए प्रवीण पाटील यांनी केले. नवज्योत फौंडेशनच्या विसाव्या संस्कार शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर हुजूर साहीब आयटीआयचे प्राचार्य गुरुबचनसिंग शिलेदार, उद्योजक अलीभाई पंजवाणी, ऍड. चिरंजीलाल दागडिया, गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रवींद्रसिंग बुंगई, माजी न्यायाधीश परमजोत सिंग चाहेल, नवज्योत फाउंडेशनचे चेअरमन नौनिहालसिंग जागीरदार, प्रा. यशपाल भिंगे, कॉ. प्रदीप नागापूरकर, राहुल गोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सीए प्रवीण पाटील म्हणाले की, सध्या सर्वत्र ' ए आय ' तंत्रज्ञानाचा बोलबाला असून हे तंत्रज्ञान तारक आणि मारक आहे, मात्र हे ' तारक ' पेक्षा ' मारक ' चेच जास्त काम करत असल्याचे मला वाटते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपणास आवश्यक असलेल्या बाबीच यातून घेतल्या पाहिजेत.
यावेळी सीए प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना जात- पात, धर्म पाळू नये, असे आवाहन केले. जातीचा गर्व बाळगणे व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माच्या नावाचा जयजयकार करणारे सरकार सध्या सत्तेत असून या सरकारला आता गॅस डिझेल पेट्रोल साठी इराणकडे हात पसरावे लागत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलप्रकाश सिंह लिखारी यांनी केले प्रास्ताविक नवज्योत सिंग जागीरदार यांनी केले तर आभार सज्जनसिंग सिद्धू यांनी मानले.
या कार्यक्रमात सायं दैनिक नांदेड वार्ताने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळच्या सत्रात सौ. अनुजा डोईफोडे यांनी 'सामाजिक सदभावना ' या विषयावर अतिशय सुंदर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी समाजामध्ये सदभावना निर्माण करणाऱ्या महनीय व्यक्ती आणि संस्थांबद्दल माहिती दिली. जिथे माणुसकी मजबूत आहे, तेथील समाज मजबूत आहे आणि जेथील समाज मजबूत आहे ते राष्ट्र मजबूत आहे हा संदेश देऊन त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. आपल्या व्याख्यानात त्यांनी अहमदनगर येथील स्नेहालय, नांदेडच्या नेरलीचे कुष्ठधाम यासह अन्य समाजोपयोगी संस्थाच्या कार्याचा गौरव केला. तर गुरुगोविंद सिंगजी, गुरुतेग बहादूरजी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मदर टेरेसा, एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून ते बनारसीदास अग्रवाल, धर्मभूषण दिलीप ठाकूर या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांचा आढावा घेतला. यावेळी योगशिक्षक विलास पाटील यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरात 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

COMMENTS