मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ, यावरून काँग्रेसने महायुती स...
मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ, यावरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "हे सरकार अवैध आणि अनैतिक धंद्यांची बजबजपुरी झाले असून, झिरवाळांच्या कारनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे नैतिक अध:पतन झाले आहे," अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.झिरवाळांचा व्हिडिओ संतापजनक
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने आणि मंत्र्याने अश्लील वर्तन करणे अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार सार्वजनिक जीवनातील नैतिकतेला काळिमा फासणारा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विलंब न करता नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. झिरवाळांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचखोरीचे प्रकरणही ताजे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
'त्या' मंत्र्यांच्या अश्लील कारनाम्यांनी महाराष्ट्राची नाचक्की
अशोक खरात या भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुतीमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लील कारनाम्यांनी राज्याची पुरती नाचक्की झाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाशी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांचे घनिष्ठ संबंध असणे हे अत्यंत लांछणास्पद असल्याचेही सपकाळ म्हणाले.
सुनेत्रा पवार गप्प का?
रूपाली चाकणकर आणि नरहरी झिरवाळ या दोन्ही प्रकरणांवर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अद्याप मौन बाळगल्याबद्दल सपकाळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. "सुनेत्रा पवार यांनी या दोघांचीही पक्षाच्या सर्व पदांवरून तात्काळ हकालपट्टी करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा: "भोळ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेले आहे. जनतेच्या विश्वासाचा भंग करणाऱ्या मंत्र्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही".

COMMENTS