वसमत: कंत्राटी सफाई कामगार, घंटागाडी चालक आणि इतर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सीटू (CITU) कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली २४ मार...
वसमत: कंत्राटी सफाई कामगार, घंटागाडी चालक आणि इतर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सीटू (CITU) कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली २४ मार्च रोजी वसमत नगरपरिषदेवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने कामगारांच्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.का काढण्यात आला मोर्चा?
वसमत शहरात कचरा संकलनासाठी सध्या कोणतीही अधिकृत एजन्सी कार्यरत नाही. नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामगारांचे वेतन दिले जाते. या पार्श्वभूमीवर कामगारांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या होत्या:
किमान वेतन: कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा.
पुनर्नियुक्ती: कामावरून कमी केलेल्या कामगारांना तातडीने कामावर घ्यावे.
सुविधा: कामगारांना सुरक्षा साहित्य संच (Safety Kit) आणि सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात.
आरोग्य तपासणी: दर तीन महिन्यांनी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी.
दिवसभर धरणे आंदोलन आणि प्रशासकीय चर्चा
मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्या अनुपस्थितीत, नगराध्यक्ष प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली. आंदोलकांनी दिवसभर धरणे धरल्याने अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
नेत्यांचा इशारा
यावेळी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. संजय आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली. "जर दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता झाली नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
मोर्चाचे सारथ्य: हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी स्थानिक समितीचे अध्यक्ष संजय आठवले, सचिव विशाल मोरे, उपाध्यक्ष अजय भिसे, इंदुबाई मोरे आणि सर्व कार्यकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल मराठवाडा

COMMENTS