बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६ व्या उलवे शाखेचे उद्घाटन

नवी मुंबई, उलवे विभागात बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६ व्या शाखाकार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते सन्माननीय श...

नवी मुंबई, उलवे विभागात बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या १६ व्या शाखाकार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री. प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते  २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. उलवे विभागात शाखा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी साईप्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक  श्री. देवदासजी डोंगरे, ट्रान्सपोर्ट आणि डॉक वर्कर्स युनियन मुंबईचे सचिव  श्री. बबनराव मेटे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  श्री. आनंद गावडे, उपाध्यक्ष श्री. भगवान शेटे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. सुरेश गावडे, श्री. बाबुराव डोंगरे, श्री. वसंत गावडे, श्री. दामाजी डोंगरे, श्री. रमेश धुमाळ, श्री. शरद डोंगरे, श्री. जगन्नाथ दाते, श्री. उमेश डोंगरे, श्री. दैवत डोंगरे, श्री. बाळासाहेब डोंगरे, सौ. निता गावडे, सौ. सुनिता डोंगरे, श्री. खंडू आहेर, सरव्यवस्थापक श्री. संजय घोगरे तसेच संस्थेचे स्थानिक सल्लागार मंडळ, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईप्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री. देवदासजी डोंगरे व ट्रान्सपोर्ट आणि डॉक वर्कर्स युनियन मुंबईचे सचिव सन्माननीय श्री. बबनराव मेटे यांनी संस्थेला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.  बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था सर्वसामान्य माणसाला आधार देणारी पतसंस्था असून संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून वाटचाल केली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. संस्थेच्या विविध आर्थिक योजनांचा लाभ सभासदांना होत असून सामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था महत्त्वपूर्ण राहील,  असे श्री. प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यामध्ये बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था आघाडीवर असून संस्थेच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल संस्थेला सहकार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयासह एकूण १२ शाखा स्वमालकीच्या असून लवकरच संस्था उर्वरित शाखा स्वमालकीच्या करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. संस्थेचे २८,००० सभासद असून संस्था रु. ३०० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. आनंद गावडे यांनी सांगितले. 

या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचा व संस्थेच्या सल्लागार कार्यकर्त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री. दामाजी डोंगरे करत असताना त्यांनी संस्थेचा २६ वर्षांचा इतिहास विशद केला व सदर उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक श्री. संजयजी घोगरे यांनी केले तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भगवान शेटे यांनी उपस्थित मान्यवर व सभासद यांचे आभार मानले.

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel