नांदेड: जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबवलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत स्थ...
नांदेड: जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी राबवलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. विमानतळ आणि धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ किलो २० तोळे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ताब्यात घेतलेले आरोपी:
सागरसिंग उधलसिंग टाक (वय ३८ वर्षे, रा. हनुमान गल्ली, उमरी). २. गजनसिंग ठाकुरसिंग बावरी (वय २१ वर्षे, रा. उमरी).
चोरीची दिली कबुली
पोलिसांनी या दोघांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर येथील ज्वेलर्स दुकान फोडल्याची कबुली दिली. तसेच धर्माबाद पोलीस ठाणे हद्दीतही घरफोडी केल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
आरोपींकडून एकूण २,२९,४०८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
चांदीच्या चैन पट्ट्या: अंदाजे १ किलो वजन (किंमत १,७५,००० रुपये).
चांदीचे दोन वाळे (कल्ले): वजन २०.४०० तोळे (किंमत ५४,४०८ रुपये).
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि रवि वाहुळे, बळीराम दासरे, माधव केंद्रे, गुंडेराव करले, मिलींद नरबाग, दिलीपकुमार चंचलवार, मोतीराम पवार, सिध्दार्थ सोनसळे तसेच सायबर सेलचे दिपक ओढणे, राजु सिटीकर आणि रेश्मा पठाण यांचा समावेश होता.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना मुद्देमालासह विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
+1
गोपनीय माहितीवरून लावला सापळा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे आणि त्यांचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. यादरम्यान, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी 'आलुनगर भोकर' येथे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेले आरोपी:

COMMENTS