२०२३–२४ मध्ये तृतीय क्रमांक, २०२४–२५ मध्ये पाचवा क्रमांक, तर २०२५–२६ मध्ये पुन्हा एकदा तृतीय क्रमांक त्यांनी मिळवला आहे. २०२३–२४ मध्ये त्यांनी "अशी वाचती झाली मुले” हा पुस्तक परीक्षणावर आधारित वाचनवर्धक नवोपक्रम सादर केला होता. २०२४–२५ मध्ये “वर्तमानपत्र वाचनातून घेऊया जगण्याचे भान” हा विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाकडे वळवणारा उपक्रम राबवण्यात आला. तर यावर्षी “मोडी लिपीतून जाणूया इतिहास” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करून विद्यार्थ्यांना इतिहास व मोडी लिपीचे महत्त्व समजावून देण्याचे कार्य त्यांनी केले.
या यशाबद्दल सौ. मनिषा कडव यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित समारंभात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे संचालक डॉ .हेमंत वसेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामुळे शाळा, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS