पाणी व भक्ष्याच्या शोधात भटकणारा बिबट्या थेट विहिरीत; वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका

किनवट : पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात भटकत असलेला बिबट्या चुकून थेट शेतातील विहिरीत पडल्याची घटना किनवट तालुक्यातील कणकी शिवारात बुधवारी दु...

किनवट : पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात भटकत असलेला बिबट्या चुकून थेट शेतातील विहिरीत पडल्याची घटना किनवट तालुक्यातील कणकी शिवारात बुधवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढून शेजारच्या जंगलात सोडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.कनकी येथील के. सूर्यकांत रेड्डी यांच्या शेतातील विहिरीजवळ भर दुपारी  बिबट्या पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात फिरत असताना तोल जाऊन विहिरीत पडला. काही वेळाने शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.

मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी घेत बचावकार्य सुरू करण्यात आले. दोरखंड, जाळी व पिंजऱ्याच्या साहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने बिबट्याला वर काढण्यात आले. सुदैवाने बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर वनविभागाने त्याला सुरक्षित  अधिवासात सोडून दिले.वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मासियोद्दीन  मसियोदिन काझी व वनपाल निलेश तायडे आणि त्यांचे सहकारी वन कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बिबट्याच्या बछड्याला वर काढले
वनकर्मचाऱ्यांच्या तत्पर आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे संभाव्य धोका टळला. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र बिबट्याची सुरक्षित सुटका झाल्यानंतर ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला.
दरम्यान, सूर्यकांत रेड्डी कल्यमवार हे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याने त्यांच्या शेतात ‘वाघ जातीचा’ बिबट्या आढळल्याने घटनास्थळी काहींनी “शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या गळाला लागला” अशी मिश्किल चर्चा रंगली होती. त्यामुळे गंभीर प्रसंगातही हलकाफुलका माहोल पाहायला मिळाला.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group