शंकरराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न.....
अर्धापूर दि.१७ ता. प्र.
आजच्या धावपळीच्या युगात माणसाच्या भावना, संवेदना, सृजनशीलतेचा ऱ्हास होत आहे. तेव्हा अशा परिस्थितीत साहित्य मानवी मनाला जोडण्याची सक्षम कार्य करते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे सचिव डी.पी.सावंत यांनी केले ते अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने *इक्कीसवीं सदी के हिंदी साहित्य में विविध-विमर्श* या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी.पवार, बीज भाषक म्हणून अंग्रेजी एवं विदेशी भाषा केंद्रीय विश्वविद्यालय हैदराबाद येथील डॉ.प्रियदर्शनी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजय टेंगसे, हिंदी विभागाध्यक्ष डाॅ.पठाण जलालखान, संयोजक डाॅ.काजी मुख्तारोद्दिन, सह संयोजक डाॅ.राम राजेगोरे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डी.डी.पवार बोलताना म्हणाले की माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात प्राध्यापकाने विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेचा विकास करण्याचे काम करावे. याप्रसंगी बीजभाषक म्हणून मनोगत व्यक्त करताना डाॅ.प्रियदर्शनी म्हणाल्यात की 21 व्या शतकातील साहित्यामधील वेगवेगळ्या बदलांचे कारण बाजारवाद, पूंजीवाद, भूमंडलीकरण, विज्ञापन आणि उपभोक्तावाद ही आहेत व यावर सविस्तर चर्चा करून उपाययोजनाची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
सदरील परिषदेत १३५ संशोधकाने सहभाग नोंदवला त्यापैकी १०५ संशोधकांनी संशोधन पेपर पाठविलेले होते. त्यांचे संकलन करून दिल्ली येथील ए.आर.पब्लिकेशनच्यावतीने छपाई व प्रकाशन करून पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. परिषदेसाठी प्रसिद्ध समीक्षक प्रो.डॉ.रमा नवले, सागर, मध्यप्रदेश येथून डॉ.संजय नाईनवाड, सिहोर, मध्य प्रदेश येथून प्रो.डॉ.तबस्सुम खान, परभणी येथील डॉ.सुजितसिंह परिहार, लातूर येथील प्रो.डाॅ.रणजीत जाधव, सोलापूर येथील डाॅ.शेख इमरान, प्रो.डाॅ.संतोष येरावार, प्रो.डॉ.ज़हीरूद्दिन पठाण, डाॅ.साईनाथ शाहू, लातूर येथील डॉ.मनोहर चपळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हिंदी विभागाचे अध्यक्ष डॉ.सुजितसिंह परिहार, यशवंत महाविद्यालयाचे डॉ.संदीप पाईकराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पीपल्स कॉलेजचे डॉ.मुकुंद कवडे, लोहा येथील डॉ.जयराम सूर्यवंशी व हैदराबाद येथील मेहफूज आलम यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्यसह तेलंगाना, उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब व दिल्ली या प्रांतातील संशोधक प्राध्यापक व शोधार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. ही परिषद संशोधक प्राध्यापक, विद्यार्थी व साहित्यप्रेमीसाठी वैचारिक मेजवानी ठरली.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजय टेंगसे यांनी या संदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाले की मराठी हिंदी व इंग्रजी भाषेसह इतर भाषांमध्ये समन्वय साधून संशोधकाने संशोधन करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पठाण जलालखान यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय परिषदेचे संयोजक डाॅ.काजी मुख्तारोद्दिन यांनी केले तर सहसंयोजक डॉ. राम राजेगोरे यांनी आभार मानले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS