शारदा कंट्रक्शन ने सुरू केलेले रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
श्रीक्षेत्र माहूर किनवट माहूर तालुक्यातील सारखणी पालाईगुडा कुपटी ते फुलसावंगी राज्यमार्ग क्रमांक 51 चे पालाईगुडा ते कुपटी येथून सुरू करण्यात आलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले असून जोपर्यंत शेतीचा मोबदला देणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेत रस्त्याचे काम दि 26 रोजी दुपारी बंद पाडल्याने अधिकारी व कंत्राटदारांना हात हलवत परत जावे लागल्याची घटना घडली आहेराज्य मार्ग 51अंतर्गत सारखणी पलाईगुडा ते कुपटी सलाईगुडा लसनवाडी चोरड भोरड वानोळा पानोळा जुनापाणी पाचुंदा इत्यादी गावासह पैनगंगा नदीपलीकडील विदर्भात असलेल्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी पर्यंत सदरील रस्ता जाणार असून या रस्त्याची रुंदी वाढवली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या रस्त्यात जाणार असल्याने नियमाप्रमाणे मोबदला दिल्यानंतरच काम सुरू करायला पाहिजे होते तसे न करता पालाईगुडा व कुपटी येथील 20 ते 22 शेतकऱ्यांना मोबदला देऊन उर्वरित दीडशेच्यावर शेतकऱ्यांना एक रुपयाही न देता त्यांच्या जमिनीची चे सपाटीकरण करण्याचा सपाटा कंत्राटदारांनी सुरू केल्याने शेतकऱ्यांनी दि 26 रोजी आंदोलनात्मक पवित्र घेत सदरील काम बंद पाडले80 फूट रुंदीचा रस्ता व दोन्हीकडून 10 फुट रुंदीच्या नाल्या असा एकूण शंभर फूट रुंदीचा हा रस्ता तयार होणार असल्याने एम एस आय डी सी विभागाने आधी शेतकऱ्यांची बैठक घेऊन सन्माननीय तोडगा काढत शासन नियमाप्रमाणे मोबदला दिल्यानंतरच कामे सुरू करावे अशी मागणी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणी दखल घेत शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मोबदला दिल्यानंतरच काम सुरू करावे अशी मागणी आंदोलन करते शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे

COMMENTS