बैठकीनंतर बाबा सोनापीर दर्गाह परिसराची केली सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी पाहनि
श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील सुफी संत बाबा सोनापीर यांच्या शहरातील दर्गाह येथे दि 5 मार्च ते 10 मार्च पर्यंत पार पडणाऱ्या उर्स निमित्त माहूर तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजीत जगताप यांचा उपस्थितीत आढावा बैठक पार पडली या बैठकीत तहसीलदार अभिजित जगताप यांनी होणारा उर्स आनंदात साजरा करत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत करून त्यांनी बाबा सोनापीर दर्गाह परिसराची अधिकारी पदाधिकाऱ्यांना घेऊन पाहणी आवश्यक सूचना दिल्या माहूर गडावर साजरा होणाऱ्या बाबा सोनापीर उरसात देशातील अनेक राज्यासह देश विदेशातील भाविक दर्शनासाठी सामील होत असतात या ठिकाणी लहान मुलांना मनोरंजनाचे सर्व साहित्य व्यावसायिक दुकाने हॉटेल्स व इतर मनोरंजनात्मक साहित्य घेऊन व्यापारी येत असल्याने लाखोंच्या संख्येने सर्वधर्मीय भाविक येथे येतात त्यामुळे महसूल प्रशासनाकडून यात्रा नियोजनाप्रमाणे येथेही सर्व सुविधा पुरविण्यात येतात तहसीलदार अभिजीत जगताप यांचे सह बैठकीत मुख्याधिकारी विवेक कांदे पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश माचेवार मरविमचे राहुल शेंडे आरोग्य विभागाचे डॉ आंबेकर वन विभागाचे वनपाल एम एन कत्तुलवार सज्जादा नशीन साजिदउल्ला जागीरदार मुजावर बाबर अहमद फकीर मोहम्मद साबाचे के एस राठोड एस जी मुखेडकर महसूल सहाय्यक सी पी बाबर शेख अकबर भाई ताहेर भाई ठेकेदार बीएसएनएलचे जावेद भाई यांचे सर्व पत्रकार मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी बैठकीनंतर बाबा सोनापीर दर्गाह येथे जाऊन भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाची पाहणी करून तहसीलदार अभिजीत जगताप यांनी योग्य त्या सूचना देत उर्स महोत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन केले मुजावर बाबर अहमद फकीर मोहम्मद यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला

COMMENTS