बिलोली प्रतिनिधी येथील जय किसान विद्यालयात वार्षिक निरोप समारंभ आणि बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार...
बिलोली प्रतिनिधी येथील जय किसान विद्यालयात वार्षिक निरोप समारंभ आणि बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविण्याचे काम ही शाळा गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवपूर्ण उद्गार शाळेचे संस्थापक सचिव उमाकांतराव गोपछडे यांनी अध्यक्षीय समारोपात काढले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत काळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, "जय किसान विद्यालय ही ग्रामीण भागातील एक उपक्रमशील शाळा असून येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न ही या शाळेची खरी ओळख आहे."वर्षभरात तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी तज्ञ शिक्षक सुरेश राठोड, गुणवंत हलगरे, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख गणेश कल्याणी, नागेश चिंतावार, गोविंद डुमनवाड, विठ्ठलराव उपासे, माधवराव माळगे आणि श्रीकांत मिनके यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात दहावीच्या विद्यार्थिनींनी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक विजय होपळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर पाटील संतोष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे नेटके संचालन कु. सुप्रिया रामपुरे हिने केले, तर साहेबराव पांचाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लगडे, सुवर्णकार, हसगुळे, होरे, आगसे, अतुल गोपछडे, सौ. रूपाताई, मदेवाड, उत्तरवाड आणि मुठनवाड यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

COMMENTS