कामगार चळवळीसमोर मिळालेले रोजगार टिकवणे अशी अनेक आव्हाने असताना देखील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माहुल येथील एजिस लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीतील कामगारांना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ असा तीन वर्षासाठी भरघोस पगारवाढीचा करार ३१ डिसेंबर २०२५ रोजी झाला असून, या करारामुळे कामगारांना कमीत कमी ६१६८ रुपये तर जास्तीत जास्त ८६०० रुपये पगारवाढ मिळणार आहे. या करारामुळे कामगारांना २२.५ दिवसाची ग्रॅज्युएटी, सेवानिवृत्त कामगारांना एक अतिरिक्त वार्षिक पगारवाढ तसेच तीन वर्षाची थकबाकी देखील मिळणार आहे. जानेवारी २०२४ पासून पाच कामगारांना बढती मिळणार असून, या करारात सुपरवायझर, चार्जमेन्, फोरमन या कॅटेगरीतील कामगारांसाठी नवीन वेतनश्रेणी निर्माण केली आहे. वेतन करारावर ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के, शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे, खजिनदार विकास नलावडे, कामगार प्रतिनिधी म्हणून जयेश तावडे , डी. एल. बोऱ्हाडे, व्यवस्थापनाच्या वतीने एन.एच.जे. राव, वरिष्ठ उपाध्यक्ष, गिरीश गुरखे, उपाध्यक्ष ( एच. आर. ), राजेश पाटील उपाध्यक्ष ( ऑपरेशन), प्रवीण जांगडे, जनरल मॅनेजर ( एच.आर. ) यांनी सह्या केल्या आहेत. याप्रसंगी एम. एच. साखरे, डी. जे. पालांडे इत्यादी कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती विश्वासराव ☺
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा