नवी मुंबई : नवी मुंबईत सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक भवन आणि गणपती मंदिर उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आव्हान माजी नगरसेवक शंकर रामचंद्र माटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्यात केले.
सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात दर महिन्याला शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे केले जातात. त्याप्रमाणे ३१ऑक्टोबर २०२५ रोजी वाढदिवस साजरे करणारा आनंद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याप्रसंगी समाजसेवक शंकर माटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना कसा आनंद मिळेल. त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. अशा कार्यक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे. सानपाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन असावे, त्याचप्रमाणे सानपाडा वासियांची प्रलंबित असलेली मागणी म्हणजे गणपती मंदिर उभारणे, हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. गणपती मंदिराबाबत ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता केमिस्ट भवन येथे सानपाड्यातील रहिवाशांची सभा आयोजित केली आहे. या सभेला सर्व सानपाडा रहिवाशांनी, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे मला वाटते.
याप्रसंगी गुलाब पुष्प देऊन ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम झाला. आनंद मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सचिव शरद पाटील, खजिनदार विष्णुदास मुखेकर, शिंदे आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. गणपती मंदिराच्या उभारणीसाठी सानपाड्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी केमिस्ट भवन येथे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी केले आहे.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा