मुंबई : भारत सरकारच्या मुंबई टांकसाळ कंपनीमध्ये ४ नोव्हेंबर २०२५ रोजी युनियन मान्यतेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये हिंद मजदूर सभेसी संलग्न असलेल्या टांकसाळ मजदूर सभेने टाकसाळ कामगार सेनेचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला आहे. टाकसाळ कामगारांनी पुन्हा एकदा टांकसाळ मजदूर सभेला मान्यता मिळून दिली आहे.
टांकसाळ मजदूर सभा ही गेल्या ६० वर्षांपासून सलगपणे मान्यताप्राप्त संघटना म्हणून कार्यरत असून, या वेळीसुद्धा कामगारांचा ठाम विश्वास आणि पाठिंबा मिळवत तिने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. यापूर्वी या संघटनेचे नेतृत्व कामगार नेते अशोक मेहता, एफ.एम.पिंटो, वसंत भाष्टे यांनी केले आहे. आता संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये हे तीन दशके अध्यक्षपद भूषवित असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अनेक ऐतिहासिक विजय यापूर्वी देखील संपादन केलेले आहेत. कॉ. विद्याधर राणे आणि कॉ. मुकुंद वाजे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर कॉ. संजय सावंत संघटनेचे सरचिटणीस आहेत.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना अॅड. एस . के. शेट्ये म्हणाले, “ मुंबई टांकसाळ मधील कामगारांच्या एकजुटीचा हा विजय असून सातत्याने आमच्या संघटनेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.” कामगारांनी यापुढेही आपली एकजूट अशीच कायम ठेवावी.
सरचिटणीस कॉ. संजय सावंत यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा