माहूर तालुक्यात कार्तिक मासानिमित्त काकड आरतीच्या माध्यमातून गावा गावात होतो रामनामाचा गजर

 .



* तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण!

माहूर (प्रतिनीधी) दर वर्षी प्रमाणे माहुर शहरासह तालुक्यात कार्तिक मासानिमित्त काकड आरतीचे आयोजन करण्यात येत असून  राम नामाचा गजर ऐकावयास मिळतो.  

हिंदू धर्मात पवित्र असलेल्या कार्तिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व असुन या महिन्यात तुलसी विवाह, व्रतवैकल्ये जप तप धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात त्यापैकीच एक म्हणजे आश्विन शुद्ध पोर्णीमा ते कार्तिक शुद्ध पोर्णीमा या काळात सुर्योदयापुर्वी कार्तिक स्नान करून गावातील मंडळी एकत्रीतपणे प्रमुख रस्त्यावरुन टाळ मृदुंगाच्या गजरात भजन भगवंतांचे नामस्मरण व रामनामाचा गजर करत ग्राम दैवत असलेल्या हनुमान मंदारासह ईतर सर्वच मंदीरात जाऊन पूजा आरती केली जाते. 

या काकड आरतीच्या माध्यमातून एकत्रित जमलेल्या नागरिकांमध्ये सुसंवाद साधला जातो तसेच गावातील नागरिकांना व्यसनमुक्त करण्यासाठी व्यसनमुक्तीची शपथही दिली जात असुन अनेकजण व्यसनमुक्त होतात. या महीन्यात सुर्योदयापुर्वी कार्तिक स्नान केल्याने आरोग्य उत्तम राहते.तसेच गावातील वातावरण भावनिक,पवित्र होऊन नवचैतन्य निर्माण होते.काकड आरती मध्ये सहभागी झालेल्या भक्तांना घरोघरी निमंत्रित करून अल्पोपहार व त्यांचा सत्कार करण्यात येतो.पोर्णीमेच्या दिवशी  नदीपात्रात काकडा विसर्जन केल्यानंतर ग्रामदैवतासह सर्व मंदीरात आरती नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाने कार्तिक मासाची सांगता करण्यात येते.

टिप्पण्या