* मटका, गुटखा,व्यवसाय जोमात.
* जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देऊन कार्यवाहीची मागणी!
राम दातीर
माहूर(प्रतिनीधी)साडेतीन शक्ति पीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहुर शहर पोलीस ठाण्यात मागील काही दिवसापूर्वीच रजू झालेले कर्तव्य कठोर म्हणुन सुपरिचित असलेले पोलीस निरीक्षक चोपडे यांनी माहूर पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच तालुक्यातील अवैध धंदे पूर्णतःबंद झाल्याचे चित्र होते.मात्र त्यांना आठ दिवस लोटताच मटका, गुटखा या अवैध व्यवसाय पुन्हा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अवैध धंदे नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन नेहमी सज्ज असते.परंतु स्थानिक पोलिसांची कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.शहरात मोक्याच्या ठिकाणी जुन्या नगर पंचायतच्या परिसरात अवैध मटका चालविणाऱ्यांना कोणत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे अभय आहे. याची चर्चा चांगलीच रंगू लागली असून आश्चर्य व्यक्त होतं आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्याह्यातील सर्व तालुक्यात कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही.मटका जुगारासह सर्वच अवैध धंद्यावर कारवाई करून ते मोडून काडा असे आदेश या पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते. मात्र माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. एका प्रकारे एस.पी.साहेबांच्या आदेशाची संबंधित पोलीस अधिकारी व ठाणेदाराकडुन आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पोलीस जवळून जातात तरीपण पोलिसांना दिसत नसेल का?
माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे गुटखा,मटका खुल्लेआम पने सुरू असून त्यांना खाकीचे अभय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कर्तव्य कठोर असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक अबीनास कुमार यांनी लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकातुन होत आ
हे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा