सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ११ उमेदवार विजयी*


महाराष्ट्र राज्यात एकीकडे नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भारतात प्रथम स्थापन झालेल्या नवी मुंबईतील अग्रगण्य अशा जवळपास १२३९ सदस्य असलेल्या सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाची त्रैवार्षिक ( ऑक्टोबर २०२५ _ सप्टेंबर २०२८ ) कालावधीसाठी 

निवडणूक नुकतीच झाली. 


अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रारंभी बत्तीस उमेदवार होते. शेवटी १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. त्या पैकी ११ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झालेले आहेत. 

निवडणुकीत ४०७ सभासदांनी मतदान केले.पण त्यातील १६ मते झाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 


 निवडणुकीची उत्तम प्रक्रिया राबविलेले संघाचे निवडणूक अधिकारी सर्वश्री रमेश मोहिते, शांताराम जावळे आणि रामचंद्र पाठक यांनी अधिकृतरित्या काल निकाल जाहीर केला.या निवडणुकीत सर्वश्री जगदीश एकावडे, अमोल शेजाळे, मारुती विश्वासराव, महादेव पाटील, सीमा बोराडे, लक्ष्मण गोळे, जगन्नाथ देसाई, शंकर घोलप, मंगला मानधने, नाना शिंदे, राजेंद्र कदम असे ११ उमेदवार विजयी झाले. संघाचे माजी पदाधिकारी मारुती कदम, शरद पाटील, विष्णुदास मुखेकर, विठ्ठल गव्हाणे, डॉक्टर विजया गोसावी, सुभाष बारवाल, बळवंतराव पाटील व कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले.


 कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर निवडणूक घेणार्‍या सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अनुकरण 

सर्वच जेष्ठ नागरिक संघांनी केल्यास ,सर्वच ठिकाणी कार्यक्षमता, पारदर्शकता वाढून ते सर्व जेष्ठ नागरिक संघ, त्यांचे सदस्य आणि एकूणच समाजाच्या भल्याचा दृष्टीने योग्य राहील असे वाटते. 

_ देवेंद्र भुजबळ 

9869484800.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज