ग्रामीण रुग्णालय माहूर येथे जागतीक मधुमेह दिन साजरा!

 


माहूर (प्रतिनीधी) माहूर शहारातील ग्रामीण रुग्णालय येथे जागतीक मधुमेहदिना निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुद्दे सर,ncd नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

यावेळी ग्रामीण रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना मधुमेह आजारा विषयी मार्गदर्शन केले. मधुमेहाची लक्षणे, धोकादायक परिणाम, नियंत्रण, योग्य आहार, नियमीत व्यायाम, रक्तातील साखरेची तपासणी यावर तज्ञ डॉक्टर व ncd समुपदेशक किरण चिरडे यांनी माहिती दिली. ग्रामीण भागातील मधुमेह आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्वांनी मधुमेह आजाराची तपासणी करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांनी केले आहे.

टिप्पण्या