वेतन आयोग, पदभरती, आऊटसोर्सिंगविरोधी ठरावांना जोरदार पाठिंबा.*



रत्नागिरी  १४ - ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन (AIRF) संलग्न नेशनल रेल्वे मजूर युनियन (मध्य रेल/कोकण रेल्वे) चे ७१वे वार्षिक अधिवेशन रत्नागिरी येथे १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान उत्साहात पार पडले. मध्य रेल्वे व कोकण रेल्वेच्या विविध विभागांमधील शेकडो प्रतिनिधी आणि हजारो सदस्य उपस्थित राहिले.

अधिवेशनाची सुरुवात १२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून काढण्यात आलेल्या भव्य मजूर रॅलीने झाली. विविध बॅनर, घोषणाबाजी आणि संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन करत ही रॅली अधिवेशन स्थळावर पोहोचली. उद्घाटन सत्रात  AIRF चे महासचिव कॉम. शिवगोपाल मिश्रा, युनियनचे महासचिव कॉम. वेणू पी. नायर आणि कोकण-मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनात रेल्वे कर्मचारी हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. त्यात प्रमुखपणे ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी, रिक्त पदे तातडीने भरणे, कॅडर पुनर्निर्माणाची गती, कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सिंगवर नियंत्रण, सुरक्षा यंत्रणा आणि वर्कशॉप्सची बळकटीकरण, तसेच कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वेत विलय या मागण्यांना सर्व प्रतिनिधींनी एकमताने पाठींबा दिला.

दुसऱ्या दिवशी महासचिवांच्या वार्षिक अहवालावर चर्चा झाली. विविध विभागांतील प्रतिनिधींनी स्थानिक समस्या, तांत्रिक अडचणी, कर्मचाऱ्यांची कमतरता, बढतीतील विलंब आणि कामाच्या वाढत्या ताणाबाबत सूचना मांडल्या. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या सत्रात युनियनच्या भावी कार्यक्रमाचा आराखडा ठरवण्यात आला.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ७ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यात वेतन आयोग, पदभरती, रेल्वे हॉस्पिटल सुविधा, निवृत्तीवेतनधारकांचे हक्क, तांत्रिक कर्मचारी प्रशिक्षण, तसेच महिला व युवा कर्मचारी सशक्तीकरणासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. याप्रसंगी संघटनात्मक एकता वाढवण्यावरही भर देण्यात आला.

महासचिव कॉम. वेणू नायर यांनी समारोपात सांगितले की,

“रत्नागिरी अधिवेशनाने रेल्वे कामगारांच्या लढ्याला नवीन दिशा दिली आहे. कर्मचाऱ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि नोकरीची स्थिरता यासाठी युनियन अधिक ताकदीने लढेल.”

संपूर्ण अधिवेशनात शिस्तबद्ध वातावरण, उत्साही सहभाग आणि संघटनात्मक ऐक्याचे दर्शन घडले. रत्नागिरीत पार पडलेले हे अधिवेशन रेल्वे कामगारांच्या पुढील आंदोलनात्मक धोरणासाठी निर्णायक ठरल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

टिप्पण्या
Popular posts
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
इमेज