डहाणू जि.पालघर येथे पार पडलेल्या १३ व्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड झाली असून नांदेड जिल्ह्यातील १३ प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ३० हजार महिलांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जमसंच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ.पी.के.श्रीमती राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.मरीयम ढवळे, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे, डहाणूचे विद्येमान आमदार कॉ.विनोद निकोले आदी नेतृत्व होते.
उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित ह्या होत्या.
१ ते ३ नोव्हेंबर या तीन दिवशीय राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्षा म्हणून कॉ.नसीमा शेख, राज्य सरचिटणीस म्हणून कॉ. प्राची हातीवलेकर तर कोषाध्यक्षपदी कॉ.रेखा देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली.
नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षा कॉ.लता गायकवाड यांची राज्य सचिव मंडळ सदस्यपदी तर कॉ.सुनीता बोनगीर यांची राज्य कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली.
कॉ.लता गायकवाड ह्या लढाऊ कार्यकर्त्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात व राज्यात अनेक आक्रमक आंदोलने झाली आहेत.
त्यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्य व कॉ.सुनीता बोनगीर यांची राज्य कमिटी सदस्यपदी एकमताने निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना सदिच्छा देण्यात येत आहेत. जनवादी महिला संघटना ही देशातील सर्वात मोठी महिलांची क्रांतिकारी संघटना असून नुकतेच राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.अशी माहिती सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार यांनी दिली आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा