परभणी : स्पर्धा खूप आहे, त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. जो चांगले, दर्जेदार आणि सोबतच कौशल्य शिक्षण घेईल तोच स्पर्धेत टिकणार आहे. त्यासाठी हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ (नाना) बागडे यांनी केले.
सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या शैक्षणिक सहल अंतर्गत ७० विद्यार्थी आणि ९ शिक्षकांनी रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजता जयपूर येथील राजभवनात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यपालांचे ओएसडी राजकुमार सागर उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी राज्यपाल बागडे यांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना राज्यपाल बागडे यांनी, राजस्थानाचा जाज्वल्य इतिहास प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आणि चांगले दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सतत प्रयत्नरत राहण्याचे आशीर्वादपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या वेळी शिक्षक अनंतकुमार विश्वंभर, गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, भगवान देवकते, सुशिल कुलकर्णी, प्रसाद कायदे, सुनिता सांगुळे, शुभांगी आष्टीकर आदींची उपस्थिती होती. राजभवनात विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. त्यानंतर ओएसडी श्री.सागर यांच्या निवासस्थानी वंदना सागर यांनीही विद्यार्थी आणि शिक्षकांचे आपुलकीने उत्साहात स्वागत केले. सेंद्रिय पालेभाज्यांचे महत्व विशद करीत परिसर दाखवला आणि हितगुज साधले. राजस्थानची प्रसिद्ध मिठाईचा खाऊ दिला. राजभवन तसेच जयपूर परिसरातील ऐतिहासिक स्थळांची विद्यार्थ्यांनी पाहणी केली.
फोटो ओळी : राजस्थानाचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सेलू येथील नूतन विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांशी जयपूर येथील राजभवनात रविवारी मनमोकळा संवाद साधला.
पूर्ण...

addComments
टिप्पणी पोस्ट करा