सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. मथुताई सावंत यांना आज पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जागतिक बँकेचे सल्लागार प्रदीप आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'अक्षरवाटा' ह्या समीक्षाग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या १३१व्या वर्धापनदिन सोहळ्याला अ. श्री. चाफेकर आणि आनंद हर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक ही न्या. रानडे, लोकमान्य टिळक इ. समाजधुरीणांनी १८९४ साली स्थापन केलेली आणि नावारूपाला आणलेली ध्येयवादी संस्था आहे. पूर्वी ह्या संस्थेचे नाव 'डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी' असे होते. १३१ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या ह्या संस्थेचा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. ही संस्था फक्त संशोधनपर आणि वैचारिक ग्रंथांनाच पुरस्कार देऊन गौरविते.
'अक्षरवाटा' हा ग्रंथ पुण्यातील चेतक बुक्स ह्या प्रकाशनाने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे. या वेळी विशेष सन्मानपत्र देऊन चेतक बुक्स ह्या प्रकाशन संस्थेचाही गौरव करण्यात आला.

addComments
टिप्पणी पोस्ट करा