नवी मुंबई सानपाडा येथील सेवन डे शाळेत ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सानपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी यांना सायबर सुरक्षा जनजागृती संदर्भात माहिती देऊन सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायबर गुन्हेगारी व सायबर सुरक्षा याबाबत जनजागृती करून माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुमित केंद्रे आणि पोलिस अंमलदार सिताराम गडदे हजर होते.
सायबर फसवणूक कशी होते याबाबत माहिती देताना सांगितले की, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन शॉपिंग, फेक लिंक, इंस्टाग्राम फेसबुक फ्रॉड, मालवेअर, फोन पे, गुगल पे फ्रॉड, ऑनलाइन ट्रेडिंग फ्रॉड, डिजिटल अरेस्ट फ्रॉड, एनसीसीआरपी पोर्टल, व हेल्पलाइन क्रमांक 1930 व 1945 बाबत माहिती देण्यात आली. तसेच नवी मुंबईचे व्हाट्सअप व इंस्टाग्राम पेजची माहिती देण्यात आली . अशी माहिती सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी दिली. आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाकरिता शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा