सावळीसह अन्य गावात बेकायदेशीर पणे होतेय दारू व शिंदीची विक्री; उ.शुल्क विभागाचे दुर्लक्ष का?

बिलोली प्रतिनिधी 

तालुक्यातील मौजे सावळीस बहुसंख्य खेड्या पाड्यांमध्ये बेकायदेशीर पणे व शासनाच्या नाकावर टिच्चून अगदी मुख्य रस्त्यावर देशी विदेशी दारूसह मानवि आरोग्यास घातक असलेल्या रसायन मिश्रीत शिंदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे या विना परवाना विक्री होणाऱ्या दारू व शिंदीची राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती असतानाही या विभागातील अधिकारी कर्मचारी याकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याच्या सिमेवर आसलेल्या बिलोली तालुक्यातुन लगतच्या तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी दारूची चोरट्या पद्धतीने विक्री होते तर महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा राज्यांत स्वस्त असलेल्या विदेशी दारूसह रसायन मिश्रीत शिंदीला बिलोली सह परिसरात मोठ्या प्रमाणात असलेली मागणी पाहता बिलोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेलंगणातुन आयात केलेल्या विदेशी दारूसह रसायन मिश्रीत शिंदीची राजरोसपणे विक्री चालू आहे.यातच कहर म्हणजे तालुक्यातील सावळी येथे झाडा पासून मिळणाऱ्या शुद्ध निराच्या नावाखाली राज्याउत्पदन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मानवी अरोग्यास घातक असलेल्या रसायन मिश्रीत शिंदीची राजरोसपणे विक्री  होती आहे.तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बियर शापीच्या परवान्यासाठी मोठ्या प्रमाणात बारची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे या बाबतची उत्पादन शुल्क विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुर्णपणे माहिती असतानाही संबंधीत विभागाकडून या अवैध व बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या धद्याकडे डोळे झाक केली जात असुन कुपणानेच शेत खाल्ले तर दाद मागयची कुठे असा प्रश्न सर्वसामान्याना पडला असुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थ पुर्ण दुर्लक्षामुळे बिलोली तालुक्यातील तरुण वर्ग व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत

टिप्पण्या