श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.



स्नेहसंमेलन मेळावा जल्लोषात साजरा 

      राम दातीर

माहूर (प्रतिनिधि)श्री जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन २००४ व २००५ च्या दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी एकत्र येत तब्बल विस वर्षानंतर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले. 


माहूर येथिल श्री दत्त शिखर संस्थांनचे टी एफ सी सेंटर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला.त्या काळातील वर्गमित्रांचे हशे, शिक्षकांची माया आणि शाळेच्या अंगणातील धूळ पुन्हा एकदा अनुभवावी असं वाटत होतं. अखेर तो क्षण आला.श्री. जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी वीस वर्षांनंतर हे सर्व वर्गमित्र व त्यांना शिकवणारे शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि परत एकदा दहावीचा वर्ग भरला.माध्य. व उच्च माध्यमिक विद्यायाचे माजी गुरुजी श्री कोरटकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती  मुनेश्वर मॅडम, श्री वाय आर राठोड सर ,श्री कपले सर ,श्री भारती सर ,श्री दवणे सर ,श्री एन जी गोडसे सर,श्री विद्यमान प्राचार्य विश्वास जाधव सर ,श्रीमती वांगे मॅडम ,श्री पोपुलवार सर ,श्री तिवारी सर, यांचे प्रमुख उपस्थितीत हा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थी व शिक्षकांना फेटा बांधून तब्बल वीस वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला . जुन्या मित्रांची भेट, त्या काळातील गमती-जमती आणि वर्गातील विनोद यांची उजळणी करत सर्वजण बालपणीच्या आठवणीत रमले. काही आठवणींनी हास्य पिकवले, तर काहींनी डोळे पाणावले. त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शिक्षकांचे आभार मानले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपल्या आठवणी सांगितल्या. यावेळी उपस्थित अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवर्णीना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन रितेश देशपांडे यांनी केले. यावेळी इर्शाद फारुकी, सचिन बेहेरे, योगीराज वाघमारे, गणेश वाडेकर, रोहित जगत, किरण चिरडे, सागर दुधे, रितेश देशपांडे, तुषार सूर्यवंशी, सचिन अंबोरे, राहुल चेंदेल, यांचे सह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारी..गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या: हर्षवर्धन सपकाळ
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज
डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव : समर्पित प्राध्यापिका*
इमेज