राम दातीर
माहूर (प्रतिनीधी) हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माल्यार्पण पूजन व दिपप्रज्वलन करून आदरांजली वाहून राष्ट्रिय एकता दिवस साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रम हा कु.सपना संजय सुरोशे यांचे अध्यक्षतेत तर जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे,अपील बेलखोडे,राज ठाकूर,गजानन भारती,सुरेश गिऱ्हे ,राम दातीर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जयंती दिन दरवर्षी हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.के.पी. वाकोडे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक आर.के.जगदाळे आभार प्रदर्शन प्र. गटनिदेशशिका कु. ए. एन. पोतदार मॅडम यांनी केले. यावेळी शिक्षक निलेश चिरडे सर यांचे सह विद्यार्थिनी विद्यार्थी , उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 
 
 
 
addComments
टिप्पणी पोस्ट करा