मनसे जिल्हा अध्यक्ष रवि राठोड याचे शेतकर्यांना पुनर्गठन न करण्याचे आव्हान...
महाराष्ट्रातील अति वृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकर्याच्या भावना पायदळी तुडवत भाजपा सरकारच्या छुप्या तोंडी आदेशाने सर्व बैंक व्यवस्थापना कडून शेतकर्यांची फसवणूक करत आहेत.
सरकार शेतकर्यांना कर्ज माफीची घोषणा करण्याआधी बैंक व्यवस्थापना कडून शेतकर्याचे पीक कर्ज खाते होल्ड करण्यात आले असून अतिवृष्टीचे अनुदान त्या खात्यात जमा करण्यात आले आहे. अनुदान उचल करण्यासाठी शेतकरी
बैंकत पैसे उचल करण्याकरिता आले की खाते होल्ड असल्याचे कारण सांगून कर्ज भरना करण्याचा दबाव शेतकरीवर बैंक
व्यवस्थापना कडून टाकत सर्रास कर्ज खाते पुनरगठण करणे भाग पाडत आहे. कर्ज खाते चालू बाकी करत आहेत.
म्हणजे जास्तीत जास्त शेतकर्यांचे कर्ज खाते चालू बाकी मध्ये आणून थकित खातेदार शेतकर्याची संख्या कमित कमी असावेत यासाठी प्रयत्न सुरू आहे.
कर्ज माफीची घोषणा
लाबणीवर नेऊन कमित कमी शेतकर्यांना कर्ज माफी मिळावी म्हणून वेळकाढू पणा करत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य च्या निवडणूकीच्या तोंडावर कर्ज माफी ची घोषणा करून आम्ही महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्ज माफी दिली. असे जाहिराती करून निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न सरकार कडून चालू आहे.
तरी सम्मानीय साहेबांनी अति वृष्टीने हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कष्टकरयाची सरकार व बैंक व्यवस्थापन कडून होत असलेल्या फसवणूक थांबून अशा या संकट काळी महाराष्ट्रातील तमाम शेतकर्यां च्या पाठीशी उभे राहून माध्यमांच्या माध्यमातुन शेतकर्यांना कर्ज खाते पुनर्गठन करू नये असे आव्हान मनसे जिल्हा अध्यक्ष रवि उत्तमराव राठोड यांनी केले आहे.

 
 
 
 
 
addComments
टिप्पणी पोस्ट करा