जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रविराज जाधवनी मारली प्रथम क्रमांकाची बाजी

खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी केले रविराजचे अभिनंदन

  • नायगाव प्रतीनीधी : तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील प्रसिद्ध शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर यांनी आपल्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन केले असल्याने गुरुजींच्याही मार्गदर्शनामुळे रविराज बळीराम जाधव हा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाची बाजी मारली असल्याने खासदार रवींद्र चव्हाण यांनी रविराज यांचे अभिनंदन केली आहे.नायगाव शहरातील जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक खेळाडूची या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली होती.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये जनता कनिष्ठ महाविद्यालयातील रविराज बळीराम जाधव या विद्यार्थ्याने 800 मीटर धावून प्रथम क्रमांक मिळविला आहे.  या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रा बैस डी.आर. व प्रा.शिंदे संगमेश्वर यांनी मार्गदर्शन केले असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष खासदार प्रा.रवींद्र पा. चव्हाण सचिव केशवराव पा. चव्हाण प्राचार्य के.जी. सूर्यवंशी उप प्राचार्य प्रा. सोमावार पर्यवेक्षक प्रा. पाटील पर्यवेक्षिका प्रा.सौ शिंदे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रविराज यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या