मुखेड मध्ये पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढविला

मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)

जिल्ह्यात पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर मोठी कारवाई सुरू केली आहे. वर्षभरापासून हे कारवाई सत्र सुरू असताना जिल्ह्यात २ व ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांवर अवैध दारू विक्रेत्यांनी हल्ला चढविला आहे. हदगाव पाठोपाठ मुखेडमध्येही असा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुखेड येथे वाल्मिकनगरात मुखेड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गणेशराव तुतुरवाड हे शुक्रवारी पांडुरंग रघुनाथ माचेवाड याच्याविरुद्ध अवैध दारू विक्रीची केस करीत होते. त्यावेळी दारू विक्रेत्याचा भाऊ अंकुश रघुनाथ माचेवाड हा थेट मुखेड पोलीस ठाण्यात पोहोचला. माझ्या भावाविरुद्ध दारूची केस का करीत आहात म्हणून पोलीस उपनिरीक्षक तुतुरवाड यांना धक्काबुक्की केली.
याप्रकरणी मुखेड ठाण्यात अंकुश माचेवाड याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक यामावर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
टिप्पण्या