प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

 

अनुकंपा नियुक्तीमुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार


नांदेड जिल्ह्यात अनुकंपासह एमपीएससी अंतर्गत 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण

 

नांदेडदि. 4 ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व  एमपीएससी मार्फत नियुक्त 378  उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणा,



 कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करुन आपल्या कुटूंबाचा अभिमानजिल्ह्याचा गौरव आणि राज्याचा सन्मान वाढवावाअशी अपेक्षा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जादिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी विविध विभागात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 आज कुसूम सभागृहात अनुकंपासह एमपीएससीच्या 21 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना संबंधित विभागाच्यावतीने आदेशाचे वितरण यावेळी करण्यात आले

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.  कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणआमदार बालाजी कल्याणकरआमदार आनंदराव बोंढारकरजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीजिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमारनिवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरअधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुखमनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखविविध विभागातील नवनियुक्त उमेदवार व त्यांचे कुटूंबिय आदींची उपस्थिती होती.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनुकंपा धारकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला.  याबाबत आमदार बालाजी कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

 

 येणाऱ्या काळात वर्ग क व ड च्या नवनियुक्त उमेदवारांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. या भरतीमुळे शासकीय कामात गतीमानता येण्यास निश्चीतच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गट क अंतर्गत अनुकंपा नियुक्त 69गट ड अंतर्गत 227एमपीएससीकडून प्राप्त उमेदवारांची 82 अशा एकूण 378 उमेदवारांना नियुक्ती आदेशाची वितरण करण्यात आले.

 

यावेळी अनेक अनुकंपा उमेदवारांनी या नियुक्तीमुळे आम्हाला व आमच्या कुटूंबाला या नोकरीमुळे खूप मोठा आधार मिळाला असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व प्रशासनाचे आभार मानले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तर सूत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी केले.


टिप्पण्या