राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत ब्ल्यू बेल्स शाळेची हॅट्रिक यशाची परंपरा कायम


नायगाव ( बा.) / प्रतिनिधी : शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमात अग्रेसर असलेल्या शहरातील *ब्ल्यू बेल्स इंग्रजी माध्यम शाळा नायगाव* चे विद्यार्थी विविध स्पर्धेत राज्यस्तरावर यश संपादन करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड येथील *ज्ञानमाता विद्या विहार* येथे *"फादर पीटर मर्मीर "* स्मृती प्रित्यर्थ गेल्या काही वर्षांपासून राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या ब्ल्यू बेल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही या स्पर्धेचे यश संपादन करीत हॅट्रिक साधली आहे. अलीकडेच झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. पण तिसऱ्यांदा *ब्ल्यू बेल्स शाळा, नायगाव* च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या वर्षीचा स्पर्धेचा विषय होता *"Moral principle are essential for the harmonious society"* या विषयावर विषयाच्या बाजूने कु. ख़ुशी भवरे हिने तर विषयाच्या विरुद्ध बाजूने कु. ख़ुशी पवार हिने संवाद साधत दोघीनीही प्रथम क्रमांक पटकवला. प्रत्येकी 5000/- पाच हजार रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तर समृद्धी पाटील (Interjector) या विद्यार्थिनी अभ्यासू प्रश्न विचारून *"बेस्ट स्कूल अवार्ड"* पटकवला. यापूर्वी सलग दोन वर्ष 2022 -23 व 2023-24 या वादविवाद स्पर्धेत कु. आर्या माकावर व कु. शिवसृष्टी गडगेकर या विद्यार्थिनींनी यश संपादन केले होते. तर यावर्षी या शाळेच्या विद्यार्थिनींनी यश संपादन करून हॅट्रिक साधली.

   शाळेचे सर्व्हेसर्वा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. के. हरिबाबु सर यांचे शैक्षणिक धोरण, दूरदृष्टिपणा व अथक परिश्रम तेवढेच प्राचार्या सौ. सीतामहालक्ष्मी मॅम यांची तेवढीच साथ आणि पर्यवेक्षिका डॉ. साईदीप्ती मॅम यांचा अभ्यासू दृष्टिकोन त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक उपक्रमात, स्पर्धा परीक्षेत, गुणवत्तेत आघाडीवर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हॅट्रिक साधली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. वर्षा मॅम यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. हरिबाबु सर प्राचार्या सौ. सीतामहालक्ष्मी मॅम, सल्लागार डॉ. साईदीप्ती प्रदीपकुमार, नागपूरहून प्रा. डॉ. रीना शहा, पुण्याहून डॉ. स्वर्णकांत, कामारेड्डीहून राजू शिवरात्री, प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने, प्रा. डोईबळे, प्रा. पाटील, गोविंद पवार, सुभाष नर्तावर, दत्ता कंदुरके, विलास सर, गंगाधर कानगुले सर, राजेश गडगेकर, लक्ष्मण पिटलेवाड, इरबाजी शेळके व शिक्षकांवृंदानी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या