जळकोट, दि. ११
येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देताना सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या वेतनातून दरवर्षी विशिष्ट रक्कम एकत्र करून सामाजिक कृतज्ञता निधी जमा करतात आणि जळकोट व पंचक्रोशीतील विविध क्षतीग्रस्त पिडीत व गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य करतात. यावर्षी महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रतीक्षा सोनकांबळे ही मेंदूचा आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने महाविद्यालयाने रुपये २५ हजाराची मदत त्या विद्यार्थिनीला केली होती. परवा माळहिप्परगा तालुका जळकोट येथील बेरोजगार तरुण ज्ञानेश्वर गोरेवार हा सोयाबीन काढत असताना अचानक हृदयविकाराने मृत्यू पावला. ज्ञानेश्वरच्या पश्चात थकलेले आई-वडील पत्नी व एक वर्षाचा मुलगा आहे. ही बातमी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळाली आणि त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी मधून ज्ञानेश्वर च्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. आज प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने, समन्वयक डॉ
नरसिंग कुडकेकर,डॉ. संजय मुंडकर, डॉ. मनीषा देशपांडे, डॉ. जगदीश जायेवार व प्रा. सुरेश कोरे यांनी माळहिप्परगा येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन रुपये पाच हजाराची आर्थिक मदत केली. यावेळी मयत ज्ञानेश्वर ची आई, वडील, आजी, चुलते, भाऊ उपस्थित होते. सामाजिक कृतज्ञता जपणारे हे एकमेव महाविद्यालय असल्याची भावना या वेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा