पुरुष गटामध्ये अर्णव करणवाल विजेता व महिला गटामध्ये प्रिता व्हर्डीकर विजयी.

राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा



सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कु. दिया चितळे पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आजच्या सत्रा मध्ये १९ वर्षा खालील मुले व मुली, पुरुष व महिला स्पर्धेचे बक्षिस वितरण  समारंभा साठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वा.रा. ती. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए.एम महाजन मा. प्राचार्य डॉ. ही यू. गवई नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र चव्हाण प्राचार्य एल. पी. शिंदे यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. या प्रसंगी डॉ. महाजन यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे १९ वर्षा खालील मुली विजेता-रुचिता दरवणकर (पुणे) उपविजेता कु. हरपिता पटेल (ठाणे) तृतिय विजेता कु.शारवणी लोके (ठाणे) तृतीय विजेता कु. सुकृती शर्मा (ठाणे) १९ वर्षा खालील मुले विजेता ईशान खांडेकर (पुणे) उपविजेता युवराज यादव (ठाणे) तृतीय विजेता कौस्तुभ गिरगावकर (पुणे) तुतीय विजेता निल मूळे (मंबई) महिला विजेती प्रिता व्हरटीकर (पुणे) उपविजेता श्वेता नायर (मुबई) तृतीय विजेता मुक्ती दळवी (ठाणे) तृतीय विजेती सुकृती शर्मा (ठाणे) पुरुष एकेरी चिजेता अर्णच करणचार (ठाणे) उप विजेता निल मुळे (मुंबई) तृतीय विजेता शौनक शिंदे (पुणे) तुतीय विजेता मंदार हर्डीकर (वाणे) या सर्व चिजयी खेळाडुंना ट्रॉफी, रोख बक्षिस व प्रमाणपत्र देउन गौरव करण्यात आला. पुढे होणाऱ्या १७ ते ११ वर्ष वयोगटील स्पर्धेचा लाभ नांदेड जिल्हायातील सर्व क्रीडा प्रेमीणी घ्यावा असे आव्हान नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष श्री नरेन्द्र चव्हाण व सचिव डॉ. अश्धिन बोरीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या