नांदेड -
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असुन 30 सप्टेंबर पासून मतदार नोंदणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. 6 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तरी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्याने तयार करण्यात येते. त्यामुळे यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपले नाव असले तरी ते रद्द होतात म्हणून पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यासाठी मतदार हा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड बीड, लातूर, धाराशीव या 8 जिल्ह्यातील कोणत्याही वयाचा व कोणत्याही शाखेचा पदवीधर व रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2022 पुर्वीचा पदवीधर असावा.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर मतदार बंधू भगिनींनो मतदानाचा तुमचा हक्क बजावण्यासाठी तुमचे आणि तुमच्या मित्र नातेवाईकांचे **फॉर्म ऑनलाइन भरावे किंवा ऑफलाइन** भरून आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जमा करावे. या बाबत आपणांस काही अडचण असल्यास जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा, आम्ही ती अडचण दूर करू. *आपण सर्वांनी मतदार नोंदणी करून परिवर्तनाच्या ह्या लढ्यात सहभागी असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, सहसचिव रेखा सोळंके, जिल्हाध्यक्ष व्ही आर. चिलवरवार, सचिव आर के वाकोडे, इ डी पाटोदेकर, जी पी कौशल्य, विजयालक्ष्मी स्वामी, डी.बी नाईक, आनंद मोरे, आर पी वाघमारे, राजेश कदम, शिवराज कदम, मंगेश चाभरेकर, अब्दुल हसीब, बालाजी टिमकीकर, आनंद सुरसे, बाबुराव घाटे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा