नांदेड:(दि.१५ ऑक्टोबर २०२५)
विद्यार्थी हाच आमचा स्वाभिमान असून विद्यार्थ्यांसाठी आम्ही सदैव तत्पर राहून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत राहू, असे प्रतिपादन विद्यार्थी सहायता मंडळातर्फे दि. १४ ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
विद्यार्थी सहायता मंडळातर्फे ३९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी सहायता मंडळाचे समन्वयक माजी अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, सदस्य डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान द्यावे; शिवाय विद्यार्थी सहाय्य मंडळाचा आपण आपल्या शैक्षणिक जीवनात उपयोग करून घ्यावा आणि त्या माध्यमातून जीवनाला आकार द्यावा, अशा प्रकारची भावना व्यक्त केली.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.अजय टेंगसे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तसेच आभार देखील मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ. अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा