नांदेड, १७ ऑक्टोबर — शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. एन. बी. भारती यांना उत्तर काशी विद्यापीठ तर्फे “शिक्षा प्रणाली पर आधुनिक प्रौद्योगिकी और कृत्रिम बुद्धिमत्ता का प्रभाव: एक विश्लेषणात्मक अध्ययन” या विषयावरील उत्कृष्ट संशोधनासाठी ‘डॉक्टरेट (Ph.D.) पदवी बहाल करण्यात आली आहे.
डॉ. भारती यांच्या या संशोधनात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षणाच्या गुणवत्तेवर, अध्यापनपद्धतींवर आणि शैक्षणिक व्यवस्थापनावर कसा परिणाम घडवते याचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. आजच्या बदलत्या शिक्षणव्यवस्थेत हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
संशोधक म्हणून कार्य करत असताना डॉ. एन. बी. भारती हे एक प्रख्यात लेखक देखील आहेत. आजपर्यंत त्यांच्या ११ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यामध्ये शिक्षणशास्त्र, बाल मानसशास्त्र, शिक्षक प्रशिक्षण आणि सामाजिक विषयांवरील सखोल विचार मांडले आहेत.
विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. तसेच ‘साधन व्यक्ती’ (Resource Person) म्हणून त्यांनी अनेक शिक्षक प्रशिक्षण शिबिरे, परिषद आणि कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे.
डॉ. भारती यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करून शिक्षण अधिक परिणामकारक बनविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग भविष्यातील शैक्षणिक धोरणनिर्मितीत होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. एन. बी. भारती यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा