नांदेड (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नाव नोंदणी सुरु झाली असून पदवीधरांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. 6 नोव्हेंबर पर्यंत ही नावनोंदणी सुरु राहणार असून पदवीधरांनी नावनोंदणी अर्जासोबत कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिकेची प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्डची प्रत जोडणे आवश्यक असल्याचीही माहिती देशमुख यांनी दिली.विशेष म्हणजे मागील निवडणुकीत नावनोंदणी झालेली असली तरी यावेळीही नव्याने नावनोंदणी करावी लागणार असल्याने पदवीधरांनी मोठ्या संख्येने या नावनोंदणी अभियानात सहभागी होवून ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन महेश देशमुख यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा