उदगीर प्रतिनिधी ,मातृभूमी महाविद्यालयात-हार्ट अटॅक आल्यानंतर तात्काळ उपचार यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिबीराचे उद्घाटन डाॅ राधेश्याम कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात यावेळी प्राचार्या उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी अचानकअॅटक आल्यानंतर सामान्य नागरिक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना जीव वाचविण्याचे प्राथमिक माहिती हार्ट अटॅकची प्रारंभिक लक्षणे ओळखणे आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रथमोपचार ,रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी घ्यावयाची काळजी तसेच “गोल्डन मिनिट्स” चे महत्त्व डाॅ कुलकर्णी यांनी सांगीतले तसेच हार्ट अटॅकस्थितीत हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्तपुरवठा थांबल्याने होणारी स्थिती. अॅटॅकची लक्षणे,छातीत दाब जाणवणे किंवा वेदना,हात, जबडा किंवा पाठीकडे वेदना जाणवणे,घाम येणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास या विषयी सखोल माहिती दिली
अॅटक आल्यानंतर तात्काळ उपचार करतांना रुग्णाला शांत ठेवणे, झोपवणे,घट्ट कपडे सैल करणे
जर उपलब्ध असेल तर अॅस्पिरिन (Aspirin 325 mg) देणे व तात्काळ १०८ क्रमांकावर वर काॅल करुन व अनुभवी व्यक्तीकडून रुग्णाच्या छातीवर दाब देणे आदि विषयी सखोल मार्गदर्श केले यावेळी कस्तुराबाई नर्सिंग स्कूल , मातृभूमी नर्सिंग स्कूल , व मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीयसेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी
प्राचार्य महादेवी कोरी प्रा प्रतीक्षा काकडे अंकिता मर्डे मीरा बिरादार नेहा वाघमारे रोहिणी काटेकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

addComments
टिप्पणी पोस्ट करा