महावितरणच्या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान ,नारीशक्तीचे कौतुक

नांदेड, दि. ०१ :- विजेच्या जोखमीच्या क्षेत्रातही महिला अधिकारी-कर्मचारी मोठया कर्तव्यनिष्ठेने काम करतात.  महावितरणमधील नारीशक्ती सर्वोच्य् सन्मानास पात्र असल्याचे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री राजाराम माने यांनी काढले.  ते महावितरणच्या नांदेड मंडलात सन्मान सौदामिनीचा सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते.महावितरणतर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त् महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसंवादपूर्ण असा सन्मान सौदामिनीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.  नांदेड येथील प्रशिक्षण केंद्रात शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी मुख्य अभियंता श्री राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती निधी गौतम, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, सहायक महाव्यवस्थापक प्रदीप सातपूते, कार्यकारी अभियंता विनय घनबहादुर, आर.पी. चव्हाण, प्रभारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीमती मंजुषा पारीपेल्ली यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 मुख्य अभियंता राजाराम माने यांनी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालय आणि कुटुंबातील जबाबदारी आणि त्यांच्या कामातील सचोटी व प्रामाणिकपणाचे कौतुक केले.  त्यापूर्वी अधीक्षक अभियंता श्रीमती निधी गौतम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती शोभा पिलंगवाड, श्रीमती मंजुषा पारीपेल्ली, श्रीमती कविता कांबळे, स्वाती लोखंडे, ज्योती कापशीकर आदींनी आपल्या मनोगतातून संवाद साधला.  कुटुंब आणि महावितरणमधील त्यांच्या जबाबदाराऱ्यांबद्दल मोनमोकळेपणाने संवाद साधला.

 आयोजित सन्मान सौदामिनीचा कार्यक्रमात महावितरणमधील सव्वाशे ते दिडशे महिलांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमात मुख्य अभियंता आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुस्त्क आणि पुष्पगुच्छ् देऊन सन्मानीत करण्यात आले.

टिप्पण्या