माणसाला माणूस बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये, आपल्या भवतालातील अनेक घटकांचा समावेश असतो. माणसाच सामाजिकरण करताना ,विविध घटक आपले योगदान देत असतात. या विविध घटकांपैकी, "वाचन "हा सर्वात महत्वाचा व उपयुक्त घटक म्हणून आपल्याला त्याकडे पाहता येईल. असे म्हणतात की, "पुस्तक वाचन म्हणजे, स्वतःचा शोध घेणे होय". अनेक यशवंत व्यक्तींचा विचार केला असता, आपल्याला सहज लक्षात येईल, की त्यांनी,"पुस्तकांवर प्रेम केले व पुस्तकांनीच त्यांचे जीवन घडवून त्यांना माणूस बनवले. आज एकीकडे विजया दशमी तर दुसरीकडे भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती." १५ ऑक्टोंबर हा दिवस म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती.
राज्य सरकारने कलाम जयंती " वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून हा दिवस ,विविध शाळा व कॉलेज यांच्या माध्यमातून, किंवा संस्थांच्या माध्यमातून" वाचन प्रेरणा दिवस"म्हणून साजरा केला जातो. आधुनिक जगातील विचारांचा अंधार दूर करण्यासाठी, तरुण पिढीला थोरामोठ्यांची पुस्तके, त्यांची आत्मचरित्रे, वाचणे खूप आवश्यक आहे. कारण पुस्तक वाचनातूनच माणसाच्या"भावनिक, मानसिक, सामाजिक या व इतर सर्व पातळीवर सकारात्मक बदल घडून यायला लागत असतो.
आज समाज माध्यमांच्या कल्लोळात, "वाचनसंस्कृतीचे दिवसेंदिवस हणन होत चालल आहे. पुस्तके वाचन ही माणसाला," नव प्रेरणा व ऊर्जा" देण्याचे उत्कृष्ट कार्य करतात.माणसांमध्ये आयुष्याची लढाई जिंकण्याचे ,अप्रतिम विश्वास निर्माण करण्याचे कार्य,केवळ पुस्तक करू शकतात ,ही बाब आपल्या अनेक महा पुरुषांकडे पाहून लक्षात येते.
वाचन आपणास भविष्य देते. अंधारलेल्या वाटेत प्रकाश मिळण्याची शक्यता केवळ पुस्तक वाचनाच्या माध्यमातून निर्माण होते. ग्रंथ आपली मित्र व सखे असतात. आपण त्यांची आयुष्यभर साथ घ्यायला हावी . आपणा आपल्या" प्रगतीचा राजमार्ग"म्हणून वाचनाकडे पाहू शकतो. आपण जेवढे वाचत जाऊ, तेवढी आपली वैचारिक समृद्धी वाढते. " ग्रंथ वाचन आपणास आंतरिक बदलाची संधी देतात, किंबहुना माणूस जेवढा वाचन करतो ,तो तेवढा जिवणाप्रती तेवढावास्तविक बनत असतो. वाचन हे आपल्या मनाला सुदृढ व निरोगी ठेवण्यसाठी रामबाण उपाय आहे.
पुस्तके माणसाला बोलत असतात, माणसाला बोलके करतात. ती आपल्या संस्कृतिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचा वेध घेण्यासाठी मदत करतात. विविध समाज माध्यमांचा वापर, व आपली व्यस्त जीवनशैली आपणास पुस्तक वाचनापासून दिवसेंदिवस दूर घेऊन जात असताना, ही बाब अत्यंत नुकसानदायक असून ,तसे होऊ नये म्हणून पुस्तक वाचन करणे म्हणजे "ज्ञानाचा व आपला स्व विकास " होणे होय. पुस्तके आपले मानसिक तहान भागवणारी उगमस्त्रोत असून, पुस्तक वाचनाचे विविध फायदे आढळून येतात. जगभरातील महापुरुष कुणाच्यातरी'" चरित्र वाचनाच्या प्रभावाने" घडलेले दिसून येतात. कुंभार जसा माठ घडवतो,तसे "पुस्तक वाचन" माणसाच्या आयुष्याला घडवण्याचे उत्कृष्ट कार्य करते. वाचनाचा आनंद येवढा दुसरा कुठलाच परमानंद नाही,पण ही बाब प्रत्येकाने अनुभवाच्या पातळीवर तपासून पहावी."वाचनाचे वेड मनुष्याला त्याच्या नैराश्य पासून , आशेच्या जगात घेऊन जाण्याचे कार्य करत असते.
पुस्तक वाचन मग ते कुठलीही असो, आपल्या मेंदूला, व विचारांना धडका मारून, आपणास विचारप्रवण बनवत असते. वाचन, "मनुष्याच्या वैचारिक समृद्धीची गुरुकिल्ली होय" भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार ;डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता, महात्मा गांधी, थॉमस एडिसन, डॉ एपीजे अब्दुल कलाम, या व इतर अनेक लोकांना"पुस्तकांनी महान बनवले . या सर्वांचा वाचनाचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवून,"पुस्तक वाचन, ही यशप्राप्ती ची गुरुकिल्ली आहे,"यशाचे कुलूप, केवळ पुस्तक वाचनाच्या किल्लीने उघडू शकते ,ही बाब आपण वेळीच लक्षात घेऊन आपल्या वाचनसंस्कृतीला संवर्धित करण्याचे ,मोलाचे कार्य करू या."वाचन, मनुष्याला मनुष्याशी जोडते, माणसाला इतर प्रदेशाशी जोडते, पुस्तकांशी एकरूप होऊन जर आपण वाचन केले, तर पुस्तके आपली मित्र बनतात. पुस्तकाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे,"जीवनातील नैराश्य दूर करून त्या माणसाच्या जीवनात"आशा, विश्वास व त्यास नवीन दृष्टी देण्याचे कार्य, पुस्तके करतात. असे म्हणतात की,
"वाचन देते
जीवनाला खरा अर्थ
करते जीवनाला ते सार्थ"
मनुष्याला वाचन ,नवीन दिशा देऊन त्याचे जगणे समृद्ध करते. विविध प्रकारच्या वाचनाने, मनुष्याची वैचारिक व बौद्धिक समृद्धी वाढते. ही समृद्धी अमर असून, वाचनातून प्राप्त झालेले ज्ञान "अमर" असते. वाचनातून आपल्याला इतरांना पण बरेच काही सकारात्मक देता येते. वाचन मनुष्याला परिपूर्ण बनवण्याचे, उत्कृष्ट माध्यम असून, या दिनाच्या निमित्ताने, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची तीव्र गरज बनली आहे.
पुस्तकांचा महिमा अमर्याद असून, त्यांचे वाचन आपल्याला परिपूर्ण माणूस बनवण्याचे कार्य करते. वाचनाचा समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे, ही बाब महत्त्वाची आहे. विजयादशमी व वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने, अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करून"सर्वदूर पसरत चाललेल्या वैचारिक अंधारावर, वाचन व त्यातून ज्ञानप्राप्ती ने मात करूया. चला, " वाचन प्रवासावर निघून , ध्येय गाठण्याचा विजय साजरा करूया".
"चला पुस्तके वाचूया
निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू या."
प्रा. अमित शिंदे.
मू.पो. रोहिपिंपळगाव.
ता. मुदखेड, जि. नांदेड.
9767851046/8956547371.
addComments
टिप्पणी पोस्ट करा