नवी मुंबई सानपाडा येथील युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सानपाडा येथे १० जुलै २०२५ रोजी सह्याद्री सोसायटीच्या समोरील ब्रिज खाली भव्य आरोग्य शिबिर व युवासेना शक्ति मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले. सानपाडा वसाहत तसेच सानपाडा गाव आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, दिलीप घोडेकर, दीपक सिंग, संजय भोसले, मिलिंद सूर्यराव, रामचंद्र पाटील, शहर प्रमुख विजय माने ,युवासेनेचे भावेश पाटील, वैद्यकीय विभाग कक्षाच्या सौ.आरती विचारे , बेलापूर विभाग प्रमुख डॉ.भूषण भोरे तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी अविनाश जाधव यांना वाढदिवसा निमित्ताने पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अविनाश जाधव यांनी वाढदिवसा निमित्त सायंकाळी युवा शक्ती मेळावाच्याचेही आयोजन केले होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, शहर प्रमुख विजय माने , महिला संपर्क श्रीमती दमयंती आचरे, बेलापूर महिला जिल्हाप्रमुख सौ.सरोज पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे , ऐरोली महिला जिल्हाप्रमुख सौ.शीतल कचरे, महिला शहर प्रमुख सुरेखा गव्हाणे , माजी नगरसेवक सोमनाथ वासकर ,शंकर माटे , उपजिल्हा प्रमुख विसाजी लोके,रोहिदास पाटील, सानपाडा जुईनगर संपर्कप्रमुख राजश्री येवले आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सानपाडा रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष मारुती कदम यांनी अविनाश जाधव यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, त्याप्रसंगी संघाचे खजिनदार विष्णुदास मुखेकर, सहखजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्ष डॉ. विजया गोसावी, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा