श्रीक्षेत्र माहूर श्री. दत्तात्रय शिखर संस्थान माहुर ता.माहुर जि. नांदेड हे देवस्थान संपुर्ण देश आणि महाराष्ट्रातील करोडो भावीकभक्तांचे श्रध्दा स्थान आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अद्यावत सुविधा मिळाव्या देवस्थानचा विकास व्हावा यासाठी गादीचे वारस चिंतामण भारती महाराज यांनी संस्थान सह येथील विश्वस्तांना सूचना पत्र पाठवले आहे
या सूचनापत्रात नमूद केल्याप्रमाणे सहधर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांचे न्यायालयातील स्वयंदाखल प्रकरण १२३/१९७७ हे प्रकरण मुंबई विश्वस्त कायदा १९५० चे कलम ५० (अ) (३) अंतर्गत दाखल करण्यात आले. या प्रकरणात आलेल्या आदेशान्वये श्री. दत्त शिखर संस्थानच्या योजनेला मंजुरीचे आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश दिनांक १२.०१.१९८८ रोजी पारीत करण्यात आला त्यानुसार श्री. दत्तात्रय शिखर माहुर ता.माहुर जि. नांदेड या सार्वजनिक, धार्मीक संस्थानची नोंदणी मुंबई विश्वस्त कायदा १९५० चे कलम २८ नुसार करण्यात आली. नोंदणी कं ए/२४६ (नदिड) आहे. सद्यस्थितीत हे संस्थान धर्मदाय आयुक्त नांदेड यांचे कार्यक्षेत्रात आहे.
हे संस्थान धार्मीक संस्थान म्हणून नोंदणीकृत असून महंत हे सर्वोच्य प्रमुख आहेत. त्यांचा धार्मीक उत्सव, कामकाज, कारभार इत्यादी बददलचा प्रत्येक निर्णय हा अंतीम मानला जातो त्यात बदल करता येत नाही. सध्याचे घटना नियमावली नुसार संस्थानचे कामकाज चालते. या घटना नियमावलीत घटना दुरूस्ती, नियम व उपनियम समाविष्ट करून संस्थानेच कामकाजात अधिक सुस्पष्टता, पारदर्शीपणा आणण्याकरीता कामकाज व्यवहार कारभार अधिक सुसुत्रपणे होवून त्याव्दारे
देवस्थानचा विकास जलदगतीने प्रभावीपणे व्हावे या करीता घटनानियमावलीत दुरूस्ती करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने या देवस्थानचे महंत गादीच्या चार पारंपारीक वारस घराण्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कायदयातील तरतुदीनुसार प्रक्रिया सुरू करण्याकरीता दिनांक ०२.०७.२०२५ रोजी वकील अॅड. चंद्रशेखर शंकराराव शिंदे रा. पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांचे मार्फत कायदेशिर सुचनापत्र विश्वस्त मंडळाला पाठविले. त्यामध्ये सुचीत करण्यात आले आहे की,देवस्थानचे महंत हे सर्वोच्य प्रमुख असून त्यांचा त्या पदावरील कार्यकाळ हा आजीवन स्वरूपाचा आहे. त्यांचे शिवाय इतर विश्वस्त यांचा कालावधी पाच वर्षापर्यंत मर्यादीत असावा त्यानंतर नविन विश्वस्त निवडण्यात यावा किंवा त्यांची फेरनिवड करण्यात यावी, सर्व विश्वस्तांनी संस्थानच्या प्रत्येक धार्मीक उत्सव सण इ. प्रसंगी पुर्णवेळ हजर राहणे अपेक्षीत आहे. धार्मीक उत्सवाचे वेळी सातत्याने गैरहजर राहणारे विश्वस्त हे विश्वस्त मंडळावर विश्वस्त म्हणून राहण्यास अपात्र ठरतील, विश्वस्तांच्या कृत्यामुळे, निष्काळजीपणामुळे संस्थानची हाणी झाल्यास दिवाणी व फौजदारी कारवाईसाठी ते पात्र राहतील.
विविध धार्मीक सण उत्सवाचे माध्यमातुन देवस्थानला होणारे उत्पन्न व खर्च संस्थानीच मालमत्ता इत्यादीचे विवरण नमुद असलेला माहिती फलक तसेच महंत गादीच्या चार पारंपारीक वारस घराण्यांचे वारसांच्या नावांचे फलक सभागृहाचे दर्शनी भागात लावणे, महंत गादी आणि अध्यक्ष
निवडी सबंधातील प्रक्रियेची माहिती देणारा फलक सभागृहाचे दर्शनी भागात लावणे. संस्थानकडे असलेल्या स्थावर आणि अस्थावर मालमत्ते सबंधीचे विवरण नमुद असलेला फलक संस्थानच्या दर्शनी भागात लावणे. वर्षभरातील धार्मीक उत्सव, सण, पालखी सोहळाचे वेळी व इतर दिवशी दानदक्षीणा, अभिषेक या पासुन प्राप्त होणारे उत्पन्न व खर्च इत्यादीची माहिती भावीक भक्तांना व्हावी या करीता उत्पन्न व खर्चाचे विवरण सार्वजनिक करण्यात यावे तसा फलक संस्थानच्या सभागृहाचे दर्शनी भागात लावण्यात यावा आणि या साठी आवश्यक ती कायदेशिर प्रक्रिया नोटीसची बजावणी झाल्यापासुन ६० दिवसात सुरू करण्यात यावी. यात कसुर केल्यास धर्मदाय आयुक्त नांदेड यांचे न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल असे सुचीत करण्यात आले आहे.
दिनांक ०२.०७.२०२५ रोजी वकीला मार्फत पाठविलेल्या कायदेशिर सुचनापत्राची बजावणी संस्थानचे महंत अध्यक्ष श्री. मधुसुदन भारती गुरू अच्युत भारती, सचिव डॉ. गणेश तुकाराम ठेंगे पाटील, कोषाध्यक्ष अॅड. नरसिंगराव पावडे, व्यवस्थापक श्री.जी.एन. नाईक, विश्वस्त अॅड. आशिष पंजाबराव देशमुख, विश्वस्त अण्णासाहेब त्रंबकराव देशमुख, विश्वस्त डॉ. विश्वासराव जांबुवंतराव माने, जिल्हाधिकारी साहेब नांदेड, विश्वस्त तहसिलदार माहुर यांना पाठविण्यात आली. सर्व नोटीसची बजावणी झाली आहे. त्यामुळे श्री. दत्त शिखर संस्थान माहुर या धार्मीक स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने तसेच संस्थानचे व्यवहार व कामकाज अधिक पारदर्शी व निकोप स्वरूपाचे व्हावे या दृष्टीने श्री. दत्त शिखर संस्थानेचे विश्वस्त मंडळ सकारात्मक दृष्टीने निर्णय घेवून सुचनापत्रामध्ये सुचीत केलेली दुरूस्ती करण्या करीता त्वरेने निर्णय घेतील अशी अपेक्षा महंत गादीचे चार पारंपारीक घराण्यापैकी श्री. चिंतामणी गुरू धनराज भारती महाराज यांनी व्यक्त केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा