नांदेड ( )
महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व सेपकटकरॉ असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी महाराष्ट्र राज्य सिनियर राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धा दिनांक 28 ते 30 जून 2025 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नांदेड जिल्हा च्या मुलाच्या संघाने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या संघाने अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत रेगु इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक पटकाविले तर टीम इव्हेंट मध्ये ब्राँझ ,आणि डबल इव्हेंट मध्ये ब्राँझ पदक प्राप्त करून 35 वी सिनियर राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धेचे विजेतेपद व ब्राँझ मेडल पटकावून जिल्ह्याचे नावलौकिक केले. नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. मुलांच्या विजयी संघात सुदेश कांबळे (कर्णधार) असंग जोंधळे, रोहित सूर्यवंशी,क्षितीज सूर्यवंशी आर्यन केशेट्टीवार, आनंद पंडित,निशांत कदम, रोहन फड, आदित्य खडसे , शिवकुमार मंगरुळे, देवानंद जागणे, नागेश तुरुकमाने,माधव कोळगाणे , पवन अंभोरे, महेश शिंदे आदी खेळाडू विजयी संघात होते सर्व यशस्वी खेळाडूंना रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामदार , राज्य संघटनेचे सचिव डॉ योगेंद्र पांडे कोषाध्यक्ष डॉ. ललित जिवानी, राज्य संघटनेचे अमृता पांडे, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नांदेड जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. विनय मुन परभणी जिल्हा संघटनेचे सचिव गणेश माळवे, इक्बाल मिर्झा सर आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा